
- 
					तयारीची वेळ20 Mins
- 
					शिजण्याची वेळ55 Mins
- 
					किती लोकांसाठी4 People
- 
					बघितले
कृती
1 Step
						
					एका भांड्यात खीसलेला कोबी, थोडे तीळ, लाल तिखट, चुरडलेला ओवा, कांदा, हळद, आलं लसूण पेस्ट, आवडीनुसार आमचूर पूड - साखर, आणि लागेल तसे बेसन पीठ हे सगळे कालवून घ्यावे. लागेल तसे पाणी घालून मिश्रण सरसरीत करून घ्यावे.
2 Step
						
					एका नांस्टिक फ्राय पॅन मध्ये जास्त तेल घालून गरम करत ठेवावे. तीळ, व फोडणीचे साहित्य घालावे व खमंग फोडणी करावी.
3 Step
						
					मिश्रणात १/२ चमचा इनो घालून लगेचच ढवळावे व ते फुलून आल्यावर हे मिश्रण फोडणीत ओतावे.
4 Step
						
					१० मिनिटांसाठी मंद आचेवर पॅन च्या खाली तवा ठेवावा व झाकून मिश्रण भाजावे. मिश्रण कोरड व शिजलयासारखे वाटले की झाकण काढावे व उलटून आणखी पाच मिनिटे भाजावे.
5 Step
						
					तयार भानोलं एका ताटावर काढावे व थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात व आवडीप्रमाणे कोथिंबीर घालावी.कोबीचं भानोलं खाण्यासाठी तय्यार.
Leave a Review
You must be logged in to post a comment.

 
									 
									 
									 
									 
									 
									
Recipe Reviews