Add Recipe

कोबीचं भानोलं

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    8,642

साहित्य:
१)२ कप बारीक चिरलेला किंवा खीसलेला कोबी
२)१ वाटी बारीक चीरलेला कांदा
३)१ टिस्पून आलं लसूणपेस्ट
४)२ टिस्पून लाल तिखट
५)१/२ टिस्पून ओवा
६)१/२ टिस्पून हळद
७) बेसन पीठ
८) चवीपुरते मिठ
९)१ टिस्पून तीळ
१०) हींग, तेल, कढीपत्ता, मोहरी फोडणीसाठी
११) आमचूर पूड किंवा १/२ लिंबाचा रस, साखर
१२) फ्रूट सॉल्ट (ईनो)

कृती

1 Step

एका भांड्यात खीसलेला कोबी, थोडे तीळ, लाल तिखट, चुरडलेला ओवा, कांदा, हळद, आलं लसूण पेस्ट, आवडीनुसार आमचूर पूड - साखर, आणि लागेल तसे बेसन पीठ हे सगळे कालवून घ्यावे. लागेल तसे पाणी घालून मिश्रण सरसरीत करून घ्यावे.

2 Step

एका नांस्टिक फ्राय पॅन मध्ये जास्त तेल घालून गरम करत ठेवावे. तीळ, व फोडणीचे साहित्य घालावे व खमंग फोडणी करावी.

3 Step

मिश्रणात १/२ चमचा इनो घालून लगेचच ढवळावे व ते फुलून आल्यावर हे मिश्रण फोडणीत ओतावे.

4 Step

१० मिनिटांसाठी मंद आचेवर पॅन च्या खाली तवा ठेवावा व झाकून मिश्रण भाजावे. मिश्रण कोरड व शिजलयासारखे वाटले की झाकण काढावे व उलटून आणखी पाच मिनिटे भाजावे.

5 Step

तयार भानोलं एका ताटावर काढावे व थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात व आवडीप्रमाणे कोथिंबीर घालावी.कोबीचं भानोलं खाण्यासाठी तय्यार.

You May Also Like

Recipe Reviews

Avarage Rating:
  • 0 / 10
Total Reviews:( 2 )
  • Mrs Rani Suhas Deshpande

    Nice recepies!

  • Avanti kulkarni

    खूपच वेगळ्या कधीही ना पाहिलेल्या आणि ऐकलेल्या रेसिपी आहेत नक्कीच करून पहिन … धन्यवाद…

Leave a Review