Add Recipe

रव्याचे रुमझूम

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    867

साहित्य-
१) ३ जास्त पिकलेली केळी
२) चवी पुरती साखर
३) १/२ वाटी रवा
४) थोडं साध दुध
५) १ टि स्पून तूप
६) पाव वाटी तांदळाचे पीठ
७) १ वाटी नाचणीचे पीठ
८) १ टि स्पून फ्रूट साॅल्ट
९) १ टि स्पून दही
१०) चवी साठी किंचित मीठ
११) वेलची पुड आवडीप्रमाणे
१२) सजवाटी साठी ड्रायफ्रूट पाॅवडर मध किंवा आवडीनूसार चाॅक्लेट साॅस

कृती

1 Step

केळी, रवा, साखर आणी थोडंस दुध हे सगळे मिक्सरला फिरवून एकजीव करणे. नंतर हे मिश्रण एका पातेल्यात काढून त्यात नाचणीचे व तांदळाचे पीठ, तूप, मीठ, वेलची पूड, दूध घालून सरसरीत करणे.

2 Step

हे मिश्रण फार पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी. हे सगळे करताना एकीकडे नाॅनस्टिक तवा गॅस वर थोडे तूप घालून तापत ठेवावा व मिश्रणात फ्रूटसाॅल्ट घालून ढवळून घ्यावे.

3 Step

तापलेल्या तव्यावर छोटे छोटे डोसे घालवे, पण ते पळीने पसरवू नये. तव्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ येऊ द्यावी. नंतर उलटून दुस-याबाजूने खरपूस भाजून घ्यावे.

4 Step

तयार रव्याचे रूमझूम वर ड्रायफ्रूट पुड, चाॅक्लेट साॅस किंवा मध घालून त्याचा आस्वाद घ्यावा.

5 Step

टिप:- हेच रुमझूम एकतारी पाकामध्ये घातले तर केळाचा मालपूवा म्हणून पण खाऊ शकता.

You May Also Like

Recipe Reviews

Avarage Rating:
  • 0 / 10
Total Reviews:( 1 )

Leave a Review