Add Recipe

काकडीची खांतोळी

  • तयारीची वेळ
    10 Mins
  • शिजण्याची वेळ
    20 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    1,110

साहित्य-
१) 1 वाटी काकडी चा खीस
२) 1 वाटी गूळ बारीक चिरलेला,
३) 1 वाटी जाड रवा (तांदुळाचा पण चालेल)
४) थोडं तूप
५) वेलदोडा, ओल खोबरं
६) काजू बदाम काप
७) वाटी खोबऱ्याचा खीस (सुकं)
८) चिमुटभर मीठ

कृती

1 Step

प्रथम काकडी 2 वाठी कीस घेऊन त्या त 1 वाटी गूळ घाला. आवडत असल्यस थोडा जास्त गूळ घालून मीश्रण एकजीव करून घ्या. काकडी चा रस सुटत जाईल.

2 Step

कडईत थोड्या तुपावर रवा खमंग भाजून घ्या व तो शिऱ्या प्रमाणे शिजवून घ्या.

3 Step

वाफ आल्यावर त्यात काकडी व गुळाचे मिश्रण व काजू बदाम चे बारीक काप आणि वेलदोड्याची पूड घालून ते एकजीव करून त्याला चांगली वाफ काढून घ्या.

4 Step

मिश्रण साधारण घट्ट होत आले की ताटाला तुपाचा हात लावावा व त्यात हे मिश्रण ओतून पसरवून घ्या. थापताना सुक्या खोबऱ्याचा खिस वरून घालून दाबून घ्या. थंड झाल्यावर आवडीच्या आकारात त्याच्या वड्या पाडा.

5 Step

काकडीची खंतोळी खायला तयार.

You May Also Like

Leave a Review