Add Recipe

आरारूट बदामी हलवा

 • तयारीची वेळ
  20 Mins
 • शिजण्याची वेळ
  55 Mins
 • किती लोकांसाठी
  4 People
 • बघितले
  701

साहित्य :-
१) १ वाटी आरारूट पावडर
२) २ वाट्या साखर
३) आवडीप्रमाणे रंग किंवा केशर वेलदोडा सिरप
४) १/२ वाटी तूप
५) खिसलेले ड्रायफ्रूटस
६) तीन वाट्या पाणी
७) किंचित मीठ
८) एक चमचा लिंबाचा रस

कृती

प्रथम दोन वाट्या पाण्या मध्ये आरारूटची पावडर एकजीव करून घ्यावी. गॅस वर नाॅनस्टिक भांड्यामध्ये दोन वाट्या साखर व एक वाटी पाणी घालून उकळायला ठेवावे. साखर पूर्ण विरघळ्यावर त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा व एकजीव केलेली आरारूटची पेस्ट पुन्हा एकदा ढवळून हळूहळू अोतावी, व ओतताना सतत हलवत रहावे, गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे. मिश्रण ढवळत असताना अधूनमधून तूप घालावे. त्यात केशर वेलदोड्याचे सिरप किंवा आपल्या आवडीप्रमाणे खायचा रंग घालावा. खिसलेले ड्रायफ्रूट पण घालावे. मिश्रण पारदर्शक होईपर्यंत हलवावे. त्याचा साधारण घट्ट गोळा झाल्यावर एका ताटात तूप लावून त्यात तयार मिश्रण अोतावे व वरून खिसलेले ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे घालवे. मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.

1 Step

You May Also Like

Leave a Review