Add Recipe

मणंगणे

 • तयारीची वेळ
  20 Mins
 • शिजण्याची वेळ
  55 Mins
 • किती लोकांसाठी
  4 People
 • बघितले
  1,034

साहित्य-
१) १वाटी चनाडाळ
२) १/२ वाटी साबुदाणा दोन तास भिजवत ठेवावे.(साबुदाणा खिचडी ला भिजवतो त्या प्रमाणे.)
३) एका नारळाचे ताजे दुध
४) वेलची पुड
५) काजूचे व नारळाचे पातळ काप
६) किंचित मीठ

कृती

1 Step

भिजवलेली चना डाळ पुरणासाठी शिजवतो तशी चार पाच शिट्या काढून शिजवून घ्यावी.

2 Step

एका पातेल्यात थोडे पाणी घालून भिजवलेला साबुदाणा पारदर्शक होईस्तोवर शिजवून घ्यावा.

3 Step

साबुदाणा शिजल्यावर त्यात शिजवलेली चनाडाळ, काजू नारळाचे काप त्यात घालावे. हे मिश्रण चांगले रटरटित शिजवून घ्यावे.

4 Step

डाळ व साबुदाण्याचे मिश्रण चांगले शिजले, कि गॅस बंद करावा. थोडे गार झाल्यावर त्यात गूळ मिश्रीत नारळाचे दुध घालून एकजीव करावे. मणंगणे तयार

You May Also Like

Leave a Review