Add Recipe

तुपाच्या बेरीचा रवा केक

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    916

साहित्य
१) १ वाटी रवा
२) १/२ वाटी तुपाची बेरी
३) १/२ वाटी पिठीसाखर
४) १/२ वाटी दही
५) १/२ चमचा फ्रूट साॅल्ट (इनो)
६) दुध
७) चिमूटभर मीठ

कृती

1 Step

प्रथम मिक्सर च्या भांड्यात १/२ वाटी दही, १/२ वाटी पिठीसाखर व १/२ वाटी तुपाची बेरी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यात १ वाटी रवा घालून एक झटका द्यावा. रवा फूलण्यासाठी मिश्रण भांड्यात काढून १० मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.

2 Step

एकीकडे कूकर मध्ये तळाशी वाळू किंवा मीठ टाकून त्यावर ऊंची वाढविण्यासाठी एखादे भांंडे किंवा स्टँड ठेवावे. १० मिनिटांसाठी कुकर प्रिहीट करून घ्यावा.

3 Step

मिश्रण सरसरीत होण्यासाठी लागेल तसे दुध घालवे. सिलिकॉन केक मोल्डला तुपाचा हात फिरवून घ्यावा. मिश्रणात चिमूटभर मीठ व १/२ चमचा फ्रूट साॅल्ट (इनो) घालावा व मिश्रण फुलून येईपर्यंत ढवळावे.

4 Step

तूप लावलेल्या सिलिकॉन मोल्ड मध्ये मिश्रण अर्ध्या पर्यंत ओतावे व तापलेल्या कुकरमध्ये ४५ मिंटासाठी मंद अाचेवर ठेवून द्यावे.

5 Step

४५ मिंटानंतर केक झालाय का हे तपासण्यासाठी त्यात सुरी खुपसून पाहावी. सुरीला जर मिश्रण चिकटले नाही तर केक तायर झाला असे समजावे. केक थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यावा.

6 Step

टिप कुकर तापवायच्या आधी कुकरची शिटी व रिंग (गासकेट) काढून ठेवावी. कपकेक साठी साधारण २० - २५ मिनिटे लागतात.

You May Also Like

Leave a Review