Add Recipe

मोड आलेल्या गव्हाच्या चिकाच्या वड्या

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    802

साहित्य-
१) १ वाटी गव्हाचा चीक
२) १ वाटी साखर
३) २ वाटी पाणी
४) १ वाटी साध दुध
५) १/२ वाटी तूप
६) रंगासाठी खस सिरप ( किंवा हिरवा खायचा रंग)
७) वेलची पुड (आवडीप्रमाणे)
८) ड्रायफ्रूट पुड
९) टुटी फ्रुटी

पूर्व तयारी
अंदाजे २ वाट्या गहू २४ तास अगोदर भिजत घालाणे. १२ तासानंतर एकदाच पाणी बदलणे. २४ तासानंतर पाणी निथळून काढावे व मोड येण्यासाठी स्वच्छ कापडात पुरचंडी करून घट्ट बांधून रिकाम्या कुकरमध्ये रात्रभर ठेवणे.

सकाळी मोड आलेले गहू मिक्सर मधून पाणी घालून बारीक वाटून घेणे. मग वाटलेल्या मिश्रणात जास्तीच पाणी घालून ते गाळून घेणे.
हे गाळलेले मिश्रण न हलवता ४-५ तास बाजूला ठेवून देणे. नंतर तुम्हाला त्यात वरती पाणी आणी खाली दाट चिक मिळेल. वरचच्यावर अलगद चिक न हलवता पाणी काढून टाकणे.

खाली उरलेला गव्हाचा चिक मुख्य कृती साठी तायर.

कृती

1 Step

एका पसरट नाँनस्टिक भांड्यात २ वाट्या पाणी, एक वाटी किंवा आवडीप्रमाणे साखर घालून उकळणे.

2 Step

एकीकडे उकळी येईपर्यंत चिक काढलेल्या भांड्यात १ वाटी साधं दूध घालून ढवळणे. हे ढवळलेले मिश्रण उकळत ठेवलेल्या पाण्यात हळूहळू अोतणे व सतत ढवळत राहणे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेणे.

3 Step

मिश्रण साधारण घट्ट होऊन पारदर्शक होत आले कि त्यात अधूनमधून तूप घालत ढवळत राहणे. मिश्रणात आवडीप्रमाणे खस सिरप किंवा हिरवा खायचा रंग, ड्रायफ्रूट पुड, वेलची पुड घालून मिश्रण हलवत राहणे.

4 Step

मिश्रण घट्ट झाले कि एक तूप लावलेल्या ताटात लगेच ओतून पटापटा थापणे. थंड झाल्यावर वड्या कापणे. मोड आलेल्या गव्हाच्या चिकाच्या वड्या तयार.

You May Also Like

Leave a Review